जितेंद्रना फाळके रत्न पुरस्कार

May 1, 2014 6:25 PM0 commentsViews: 197

01 मे : मुंबईमध्ये दादासाहेब फाळके ऍकेडमी ऍवार्डचं वितरण करण्यात आलंय. यावर्षी ‘गुलाब गँग’ या चित्रपटातल्या भुमिकेसाठी बेस्ट अँक्टरेसचा ऍवार्ड जुही चावलाला देण्यात आला आहे. तर फरहान अख्तरला ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातल्या भूमिकेकरता बेस्ट ऍक्टरचा ऍवार्डने गौरवण्यात आलंय. गायिका सुनीती चव्हाण हिला ‘धूम 3′ चित्रपटातल्या गाण्यासाठी ऍवार्ड देण्यात आला. तर अभिनेता जितेंद्र यांना त्यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटातल्या अभिनय कारकिर्दीकरता दादासाहेब फाळके रत्न पुरस्कार देण्यात आला. जितेंद्र यांच्या कारकिर्दीला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे या पुरस्काराचं महत्त्व निश्चितपणे वेगळं असल्याचं जितेंद्र यांनी सांगितलंय. ऍकेडमी तर्फे चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल के.शंकरनारायण आणि दादासाहेब फाळके ऍकेडमीचे सगळे सदस्य उपस्थित होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close