गुजराती ‘बेपारी’ महाराष्ट्र दिनात सहभागी का होत नाहीत ?:शिवसेना

May 1, 2014 8:29 PM1 commentViews: 2379

uddhav_thackeray--621x41401 मे : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती समाजाला टार्गेट केलंय. शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून गुजराती व्यापार्‍यांवर टीका केली. महाराष्ट्रात राहुन पैसा कमवणारे हे व्यापारी महाराष्ट्र दिनाच्या जन्मोत्सवात का सामिल होत नाहीत अशी टीका सेनेनं केलीय.

महाराष्ट्रात मिळालेल्या पैशाच्याच्या जोरावर आज ही मंडळी कुणाला पंतप्रधान करायचं यासाठी सत्तेचा सारीपाट मांडून बसले आहेत. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आलेल्या या व्यापारी समाजाने महाराष्ट्रासाठी एकत्र यावं असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सेनेची ‘सामना’तून टीका

महाराष्ट्रासाठी झालेल्या बलिदानावर श्रद्धा असलेला सामान्य मराठी माणूस आजच्या दिवशी हुतात्म्यांचे स्मरण करेल. पण मलबार हिल, वाळकेश्वर, कफ परेड, कुलाबा, जुहू भागात राहणारे धनवान लोक महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात कधीच सहभागी झाले नाहीत. मुंबईत राहून त्यांनी सत्तासंपत्तीचा भोग घेतला. त्यांनी महाराष्ट्राला शोषून स्वतःच्या सोन्याच्या द्वारका उभ्या केल्या आणि मुंबईतल्या पैशाच्या जोरावर हे सर्व उद्योगपती देशातल्या सत्तेचा सारीपाट मांडून बसले आहेत. कुणाला पंतप्रधान बनवायचे आणि कुणाला खेचायचे याचे आडाखे ठरत आहेत.

 

एरवी ‘आमचा राजकारणाशी संबंध नाही, आम्ही बरे की आमचा बेपार’ असे बोलणारे हे सर्व ‘बेपारी’ आज आपल्या मातीचा आणि जातीचा पंतप्रधान व्हावा यासाठी प्रांतीय वज्रमूठ घेऊन एकत्र आलेच ना? पण महाराष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी यापैकी किती ‘बेपारी’ महाराष्ट्र दिनी आपल्या उंची इमल्यांतून खाली उतरुन महाराष्ट्र दिनाच्या जन्मोत्सवात सामील झाले?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aquarian_Truth

    Ekda baba Udhhav shanya sakha bolala. Assa wata Gujurathi itun phude fata bajplach matadan karnar ahet, ta mulhe Shiv sena cha marathi pan jaga jalai….

close