नितीन आगे हत्येप्रकरणी उज्जल निकम यांची नियुक्ती करा -आठवले

May 1, 2014 9:26 PM0 commentsViews: 1165

345ramdas athavale01 मे : अहमदनगर जिल्ह्यातल्या नितीन आगे या दलित तरुणाच्या कुटुंबीयांची आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी भेट घेतली. जामखेडमधल्या नितीन आगेची प्रेमप्रकरणाच्या संशयातून हत्या झाली होती.

 

या प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यात दलितांवर अत्याचार वाढत असल्याने याबाबत गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घेणार भेट असल्याचंही ते म्हणाले.

 

सध्या ऍट्रोसिटीच्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याची भावनाही रामदास आठवलेंनी व्यक्त केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close