सपाच्या रॅलीत पैसे वाटप

April 6, 2009 8:56 AM0 commentsViews: 1

6 एप्रिलसमाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान आझमींच्या फॉर्म भरतेवेळी निघालेल्या समाजवादी पार्टीच्या रॅलीत अबू आझमींचा भाऊ सईद अन्सारीनं एका डान्सिंग पार्टीच्या कामगारांना पैसे वाटप केल्याचं उघड झालं आहे. आझमी फॉर्म भरण्यासाठी जात असतानाच सईद यानं हे पैसैवाटप केल्याचं आढळून आलं आहे. असं असतानाही अबू यांनी मात्र पैसैवाटप झाल्याचा इन्कार केलाय. उत्तर पश्चिम मुंबईमधून आझमी समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर यावेळी जया बच्चन आणि अमरसिंगही उपस्थित होते. अबू आझमींच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या गुरूदास कामत यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

close