मोदींनी प्रियांकाचा उल्लेख ‘मुलीसारखी’ असा केलाच नाही- भाजप

May 2, 2014 10:58 AM0 commentsViews: 1989

modi byte02 मे :  ‘मोदींनी कुठेही प्रियांका माझ्या मुलीसारखी आहे असं म्हणलेलं नाही’ असा दावा मोदींच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीवरून एका नव्या वादाला आता तोंड फुटलं आहे.

दूरदर्शनने या मुलाखतीतला काही भाग वगळला असून मोदींनी प्रियांका गांधींचा ‘त्यांच्या मुलीसारखी’ असा उल्लेख केल्याचं भासवल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारकडून असा दबाव आल्याने हे केलं गेल्याचं भाजपने म्हटलं आहे. मुलाखतीतून वगळलेला भाग भाजपने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी प्रियांका आपल्या कुटुंबासाठी लढतील असं म्हणत असल्याचं स्पष्ट होत आहे. पण यामध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप नव्हता, किंवा मुद्दाम कोणताही भाग वगळला गेला नसल्याचं दूरदर्शनने म्हटलं आहे.

दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी ‘प्रियांका मुलगी आणि बहीण आहे, जी तिच्या कुटुंबासाठी काहीही करु शकते. त्यामुळे मी प्रियांकाची टीका गांभिर्यानं घेत नाही’, असं म्हणाले होते. पण दूरदर्शनने प्रसारीत केलेल्या मुलाखतीत अनेक भाग वगळण्यात आले असून मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका गांधी माझ्या मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधी आणि सोनिया गांधींप्रमाणे प्रियांका राजकीय शत्रू नाहीत असंही त्यांनी म्हटलं होतं.

 मोदींच्या या वक्तव्यावर प्रियांका गांधी संतप्त झाल्या आहेत. त्यांनी मोदींना उत्तर देताना मी केवळ राजीव गांधींची मुलगी आहे असं म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने केलेल्या सगळ्या आरोपांचं दूरदर्शनने एका पत्रकाद्वारे खंडन केलं आहे.

दूरदर्शनचा खुलासा
” मुलाखतीतला कोणताही भाग वा मुद्दा वगळण्यात आला नाही. जो काही भाग वगळण्यात आला तो पोस्ट – प्रोडक्शनच्या वेळी तांत्रिक कारणांमुळे वगळला गेला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाचाही हस्तक्षेप नव्हता किंवा कोणाचंही नियंत्रण नव्हतं. मुलाखतीतला महत्त्वाचा भाग डीडी न्यूजच्या महत्त्वाच्या बुलेटिन्समध्ये दाखवण्यात आला. टेलिकास्टच्या आधी मुलाखतीला भरपूर प्रसिद्धीही देण्यात आली आणि दुसर्‍या दिवशी ही मुलाखत पुन्हा दाखवण्यात आली. ”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close