मोदींकडून आचारसंहिता भंग नाही, पोलिसांची क्लीन चिट?

May 2, 2014 2:01 PM0 commentsViews: 3952

fir_narendra_modi02 मे :  मोदींविरोधात आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण मोदींची पत्रकार परिषद 100 मीटर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अहमदाबाद क्राईम ब्रान्चने दिल्याची बातमी पीटीआयने दिलेली आहे.

बडोद्यात मतदानानंतर हातात कमळाचं चिन्ह घेऊन मोदींनी पत्रकार परिषदेत घेतली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना दणका देत गुजरातमधल्या संबंधित अधिकार्‍यांना मोदींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

मोदींविरोधात लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 (1ब) या कलमानुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही उमेदवाराला निवडणूक चिन्ह दाखवण्यावर बंदी आहे. त्यावर गुजरात पोलिसांनी, मतदानाच्या दिवशीच्या मोदींचं भाषण हे मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराच्या बाहेर असल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे.

या प्रकरणात काँग्रेसने मोदींची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही  केली निवडणूक आयोगाकडे केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close