जलुकपुरी स्फोटात 6 ठार, 14 जखमी

April 6, 2009 9:36 AM0 commentsViews: 1

6 एप्रिल, जलुकपुरी गुवाहाटीतल्या जलुकपुरी भागातल्या मालीगावमध्ये स्फोट झाला आहे. त्यात 6 जण ठार तर 14 जण जखमी झालेत. गजबजलेल्या मार्केटमध्ये दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी हा स्फोट झाला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. पंतप्रधान उद्या दिब्रुगडला भेट देणार होते. त्याअगोदर एक दिवस आधीचं हा स्फोट झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मार्केटमध्ये पार्क केलेल्या एका मोटारसायकलवर ही स्फोटकं ठेवल्याचं वृत्त हाती आलं आहे.

close