सट्टेबाजांचा कौल, एनडीएला 317 जागा मिळतील !

May 2, 2014 4:19 PM0 commentsViews: 6631

02 मे : लोकसभा निवडणुकीचे आता दोनच टप्पे शिल्लक आहेत. कोणत्या आघाडीला बहुमत मिळणार किंवा लोकसभा त्रिशंकू राहणार का याविषयीचे अंदाज बांधण्यात राजकीय नेते आणि राजकीय पंडित मग्न आहेत. त्याचवेळी सट्टाबाजारात मात्र नरेंद्र मोदींच्या नावाचीच चर्चा आहे. एनडीएला 317 जागा मिळतील असा सट्टेबाजांचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणुकांचा निकाल लागायला 2 आठवडे शिल्लक आहेत. निकालाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सट्टाबाजाराने मात्र आपल्यापुरता निकाल देऊन टाकलाय. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला 317 जागा मिळतील असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. त्याबरोबरच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत, असंही सट्टेबाज सांगतात.

या निवडणुकीत एनडीएच आघाडीवर आहे. सध्या मोदींवर 48 पैसे दर आहे, राहुल गांधींवर 60 पैसे, मुलायम सिंह यादवांवर 5.50 रुपये तर अरविंद केजरीवाल यांच्यावर 11.50 रुपये असा दर असून सट्टा बाजारात मोदींची लहर आहे, आणि एनडीए स्पष्टपणे फेव्हरिट आहे असं बुकी म्हणताय. थोडक्यात, सट्टाबाजारातही मोदींची हवा आहे.

देशाच्या सर्व भागात मोदींची लाट असल्याचं सट्टाबाजार सांगतो. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एनडीएला 128 पैकी 85 जागा मिळतील असा अंदाज आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात 18 आणि तामिळनाडूमध्ये 8 जागा एनडीएच्या वाट्याला येऊ शकतात. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात एनडीएला जवळपास सर्वच जागा मिळतील असं सट्टाबाजाराला वाटतं. प्रियांका गांधींना मात्र सट्टाबाजाराची चांगलीच पसंती असल्याचं दिसतंय. बुकी सांगतो, “सट्टा बाजारात फोरकास्ट नावाचा प्रकार असतो. त्यामध्ये प्रियांका गांधींवर 12 पैसे इतका दर आहे.”

सट्टाबाजाराच्या व्यवहारांवर पोलिसांचं सध्या बारीक लक्ष असल्यामुळे आता बराचसा व्यवहार गुजरात आणि दुबईमधून होतो. इतकंच नाही, तर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी व्हॉट्स ऍपवरच सट्टा लावला जातो. इतरांसाठी निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असेल पण सट्टाबाजारासाठी हा 38 हजार कोटी रुपयांचा खेळ आहे.

सट्टाबाजाराचा अंदाज

  • - उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र – 85 जागा
  • - कर्नाटक – 18, तामिळनाडू – 8 जागा
  • - राजस्थान, मध्य प्रदेश – जवळपास सर्व जागा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close