राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

May 2, 2014 8:17 PM1 commentViews: 6643

89raj_thackarey_mns02 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात औरंगाबादमधल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. जालना-औरंगाबाद रोडवर एसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी 2008 साली दगडफेक केली होती.

या प्रकरणी राज ठाकरेंना सुनावणीसाठी हजर राहायला सांगितलं होतं. पण राज ठाकरे सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांना अखेर वॉरंट जारी केलंय. आता या प्रकरणी पुढची सुनावणी 8 मे ला होणार आहे.

2008 साली राज यांनी उत्तर भारतीयांना टार्गेट केलं होतं. याप्रकरणी राज यांना अटकही करण्यात आलं होतं. या अटकेच्या निषेधार्थ मनससैनिकांनी राज्यभरात तोडफोड आणि जाळपोळ केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Ulhas

  काय भिकारडी न्याय व्यवस्था आहे ही.
  कसल्या सुनावण्या घेता?
  “अनेकवेळा सुनावणीसाठी गैरहजर”..असं काही अमेरिकेत झालं तर त्या व्यक्तीला एव्हाना फासावर लटकवून मोकळी झाली असती तिथली यंत्रणा ..
  आढळला ना राज ठाकरे दोषी तुम्हाला? मग पाठवा ना पोलिस
  घरी त्याच्या आणि करा जी शिक्षा करायची असेल ती.. भारतातल्या कोर्ट कचेऱ्या म्हणजे नुसता टाईमपास आहे..
  सनी देओल म्हणाला होता तेच खरं. “तारीख पे तारीख” दुसरं काही नाही. खटला चालवणाऱ्या न्यायाधीशाला अकार्यक्षम आणि ढिसाळ हाताळणी बद्दल शिक्षा व्हायला हवी अगोदर !

close