आदर्श सोसायटीला धक्का, संरक्षण मंत्रालयाची याचिका फेटाळली

May 2, 2014 8:31 PM1 commentViews: 298

Image img_236542_aadarshscam34_240x180.jpg02 मे : आदर्श सोसायटी प्रकरणी कोर्टाने ‘आदर्श’ धक्का दिलाय. आदर्शवर हक्क सांगणारा संरक्षण मंत्रालयाचा 2012 चा दावा फेटाळून लावा अशी विंनती करणारी याचिका आदर्श सोसायटीने कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावलीय.

आदर्शची जागा सरकारची की संरक्षण मंत्रालयाची यावरुन बराच वाद झाला होता. संरक्षण मंत्रालयाने आदर्शच्या जागेवर दावा केला होता. तर राज्य सरकारने ही जागा आपली असल्याचं सांगितलं होतं. अखेर हा वाद कोर्टात गेला. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.

2012 मध्ये संरक्षण मंत्रालयाने ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी सुरूच राहणार आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर कारवाई करावी, या मागणीसाठी केतन तिरोडकर यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. अशोक चव्हाण यांना आरोपी यादीतून वगळण्यात यावं अशी मागणी सीबीआयने कोर्टात केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Santosh Varkute

    GHOTALE BAJANA DANKE BASAYLACH PAHIJET

close