प्रिया दत्त भरणार बुधवारी उत्तर-मध्य मुंबईसाठी उमेदवारी अर्ज

April 6, 2009 9:46 AM0 commentsViews: 1

6 एप्रिल, मुंबई प्रिया दत्त आज उमेदवारी अर्ज भरणार होत्या. मात्र कलेक्टर ऑफिसमध्ये उशीरा पोचल्यानं त्या अर्ज भरू शकल्या नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना बुधवारची वाट पहावी लागणार आहे. ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानं आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पोहोचायला उशिर झाल्याचं प्रिया दत्त यांनी सांगितलं. त्या उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. आणि त्यांच्याविरोधात आहेत भाजपचे महेश जेठमलानी. प्रिया दत्त यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. या निवडणुकीच्या रणधुमाळीत न थकता प्रचार करता येऊ दे अशी प्रार्थना यावेळी केल्याचं प्रिया दत्तनी सांगितलं.

close