राष्ट्रीय चॅनलला स्वातंत्र्यासाठी झगडावं लागतं -मोदी

May 3, 2014 3:47 PM0 commentsViews: 974

modi03 मे : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुखालतीवरून वाद सुरूच आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केलीय. आपल्या राष्ट्रीय टीव्ही चॅनेलला व्यावसायिक स्वातंत्र्य जपण्यासाठी झगडावं लागत असल्याचं पाहून वाईट वाटतं अशी नाराजी मोदींनी व्यक्त केली.

 

तसंच आम्ही आणीबाणीचा थरकाप अनुभवलाय. त्यावेळी वर्तमनापत्राचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपलं जात होतं. हा लोकशाहीला कलंक आहे अशी टीकाही मोदींनी केली.

 

मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीतले अनेक मुद्दे वगळण्यात आलेत. प्रियांका गांधी आपल्याला मुलीसारखी आहे असं मोदींनी मुलाखती म्हटलं असा दावा करत काँग्रेसने मोदींवर सडकून टीका केली होती. मात्र भाजपने काँग्रेसचा दावा फेटाळून लावला. मोदी असं काही म्हटलेच नाही असा खुलासा भाजपने केला. तसंच सरकारच्या दबावाखाली मुलाखीतून काही मुद्दे वगळण्यात आल्याचा आरोपही भाजपने केला. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी मोदींचे आरोप फेटाळून लावलेत. दूरदर्शन स्वायत्त असल्याचं तिवारी म्हणाले.

मोदींची नाराजी

आपल्या राष्ट्रीय टीव्ही चॅनेलला व्यावसायिक स्वातंत्र्य जपण्यासाठी झगडावं लागत असल्याचं पाहून वाईट वाटतं. आम्ही आणीबाणीचा थरकाप अनुभवलाय. त्यावेळी वर्तमनापत्राचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपलं जात होतं. हा लोकशाहीला कलंक आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close