राष्ट्रवादीने प्रचार न करणार्‍या नेत्यांना बजावल्या नोटिसा

May 3, 2014 2:09 PM0 commentsViews: 1501

Image img_232402_ncp52353_240x180.jpg03 मे : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांचा प्रचार न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने 6 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

नोटिसा बजावलेल्यांमध्ये राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समसेर वरपूडकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या किर्ती उड्डाण, बाबासाहेब आकाते या सहाजणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत 7 मेपर्यंत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close