बिग बींना ‘भूत’गिरी पडणार महागात, पोलिसांत तक्रार दाखल

May 3, 2014 2:06 PM0 commentsViews: 2817

complan amitabh bachchan ad03 मे : ‘भूतनाथ’ची भूमिका साकारणारे बॉलिवडूचे शहेनशहा अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘भूतनाथ’ रुप धारण केल्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

भूतनाथ रिटर्न्सच्या यशानंतर कॉम्प्लानने अमिताभ बच्चन यांना घेऊन एक जाहिरात तयार केली. ही जाहिरात आता सर्व वाहिन्यांवर प्रसिद्ध झालीय पण या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांनी वठवलेली भुताची व्यक्तिरेखा त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या जाहिरातीमुळे नव्याने झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग झाल्याचा आरोप एका पुणेकरांने केलाय.

या प्रकरणी पुण्यात अमिताभ यांच्यासह हेन्स इंडिया कंपनीचे जाहिरात व्यवस्थापक अभिषेक प्रसाद आणि व्यवस्थापकीय संचालक सीमा मोदी यांच्याविरुद्ध फौजदारी दावा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या कसबा पेठेतील एका व्यक्तीने ही तक्रार केल्याचं समजतेय. नव्यानं झालेल्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा 2013 चा भंग केल्याचा आरोप तिघांवर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close