होय,निवडणुकीच्या वेळी आघाडीत धुसफूस होती -मुख्यमंत्री

May 3, 2014 8:55 PM0 commentsViews: 1533

cm pruthviraj chavan03 मे : लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस होती अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

स्थानिक पातळीवर मित्रपक्षांकडून प्रश्न निर्माण झाले होते. काही ठिकाणी कुणी मतदान केले काही ठिकाणी केले नाही. ज्या ठिकाणी वाद निर्माण झाले त्या ठिकाणी नेत्यांनी प्रश्न सोडवली पण काही ठिकाणी ते अपयशी राहिले असा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला.

तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सोबतच राहील, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावतीमध्ये आघाडीत चांगलीच बिघाडी झाली होती. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही समजूत काढून सुद्धा कार्यकर्ते आपल्या मतावर ठाम राहिले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close