गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

May 3, 2014 9:21 PM0 commentsViews: 172

gujzar_sabha03 मे : देशातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणार्‍या 61 व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं आज (शनिवारी) दिल्लीत वितरण झालं. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसंच ‘तुह्या धर्म कोंचा’ या सिनेमाने सामाजिक बांधिलकीसाठी पुरस्कार मिळवला. स्पेशल ज्युरी पुरस्कार पटकावला महेश लिमये दिग्दर्शित ‘यलो’ने तर याच सिनेमासाठी गौरी गाडगीळ आणि संजना राय यांना स्पेशल ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘फँड्री’ या सिनेमासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पदार्पणात बेस्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊ गौरवण्यात आलं. तसंच फँड्री सिनेमात प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘जब्या’ सोमनाथ अवघडे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर बेला शेंडे यांना सर्वोत्कृष्ट गायिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिला अस्तू या सिनेमातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close