सत्यम घोटाळाप्रकरणी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक

April 6, 2009 10:48 AM0 commentsViews: 4

6 एप्रिल सत्यम घोटाळाप्रकरणी सीबीआयनं सत्यमच्या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक केलीय. सीबीआयनं 20 फेब्रुवारीपासून सत्यम प्रकरणाच्या तपासाची सूत्र हातात घेतल्यापासून प्रथमच अशा प्रकारे अधिकार्‍यांना अटक होत आहे. सत्यमच्या फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष जी. रामकृष्ण , त्यांचा असिस्टंट- श्रीशैलम आणि जनरल मॅनेजर वेंकटपती राजू यांना सध्या अटकेत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर या घोटाळ्यात सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजूंना साथ देण्याचा आरोप आहे. सत्यमच्या फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष जी. रामकृष्ण , त्यांचा असिस्टंट- श्रीशैलम आणि जनरल मॅनेजर वेंकटपति राजू यांना सध्या अटकेत ठेवण्यात आलंय. त्यांच्यावर या घोटाळ्यात सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजूंना साथ देण्याचा आरोप आहे. सत्यमचे माजी सीईओ श्रीनिवास वदलामणि यानं आयसीआयए आणि सीआयडीला दिलेल्या उत्तरांमध्ये जी.रामकृष्ण याचं नाव घेतलं होतं. या तिघांनाही आज हैदराबादच्या नामपल्ली कोर्टात दाखल केलं जाणार आहे. येत्या नऊ एप्रिलला सीबीआय या प्रकरणाची चार्जशीट दाखल करेल अशी शक्यता आहे.

close