स्नूपगेट प्रकरणात मोदींच्या चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध

May 4, 2014 4:29 PM0 commentsViews: 2537

praful patel04 मे : स्नूपगेट प्रकरणात नरेंद्र मोदींच्या चौकशीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. निवडणुकीचा निकाल यायला अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना मोदींविरोधात चौकशी करणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे यासंबंधी आपलं मत व्यक्त केलं आहे.

कपिल सिब्बल यांनी या चौकशीसाठी न्यायाधीशांची 16 मेच्या आधी नेमणूक करण्यात येईल असं स्पष्ट केल्यावर राष्ट्रवादीने आपलं मत व्यक्त केलंय. 2009 साली बंगळुरुमधील एका आर्किटेक्ट तरुणीवर पाळत ठेवल्याचा भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी गुजरात राज्य सरकारने एका चौकशी समितीची नेमणूक केली. याचा अहवाल तीन महिन्यांत अपेक्षित होता. पण यासंबंधी समितीची अजून एकही बैठक झालेली नाही. 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close