रोहन अपहरण आणि हत्याकांड प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

May 4, 2014 2:07 PM0 commentsViews: 625

rohanकल्याणमधील बहुचर्चित रोहन गुच्छेत या शाळकरी विद्यार्थ्याच्या अपहरण व हत्याप्रकरणाच्या तपासकामात हलगर्जीपणा करणार्‍या दोघा पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रविंद्र तायडे व पोलिस उप निरीक्षक आर.एम. गोळे अशी या निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत.

कल्याणमध्ये राहणार्‍या रोहन गुच्छेत या १२ वर्षाच्या मुलाचे १७ एप्रिलला अपहरण झालं होते. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अपहरणकर्त्यांनी रोहनला बोलवून घेतले व यानंतर त्याचे अपहरण केले. रोहनचे वडिल हे सोनार व्यावसायिक आहेत. अपहरणकर्त्यांनी रोहनच्या आईवडिलांना फोन करुन 50 लाखांच्या खंडणीची मगणी केली होती. मात्र यानंतर पैसे मिळत नसल्याने अपहरणकर्त्यांनी रोहनची हत्या केली. २७ एप्रिल रोजी रोहनच्या मृतदेहाचे तुकडे कल्याणमधील एपीएमसी मार्केटजवळ एका गोणीत आढळले होते. या हत्येमुळे कल्याणमध्ये खळबळ माजली होती.

याप्रकरणाचा पोलिसांच्या या हलगर्जीपणाविषयी गुच्छेत कुटुंबाने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल पोलिस आयुक्तांनी घटनेचा तपास पोलिस उपायुक्तांकडे सोपवला होता. तसेच पोलिस अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेशही दिले होते. यानंतर आज ठाणे पोलिस आयुक्तांनी दोघा पोलिसअधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close