‘INS विक्रांत’च्या लिलावाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

May 5, 2014 6:10 PM0 commentsViews: 460

ins vikrant05 मे : भारताची पहिली युद्धनौका INS विक्रांतच्या लिलावाससुप्रीम कोर्टाने सोमवारी स्थगिती दिली. कोर्टाने याप्रकरणी संरक्षण मंत्रालय आणि इतर संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली असून, पुढचा निर्णय काही दिवसांंमध्ये घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिकाही दाखल केली होती. मात्र, त्यांची याचिका फेटाळत हाय कोर्टाने युद्धनौकेचा लिलाव करून ती भंगारात देण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं INS विक्रांतचा लिलाव करण्यास स्थगिती दिली आहे. ही युद्धनौका आहे त्या परिस्थितीत ठेवा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close