पॅन्टॅलून्स फेमिना मिस इंडिया-2009 : तीनही विजेत्या दिल्ली-मुंबई-पुण्याच्या ‘बिग टाऊन गर्ल्स’

April 6, 2009 1:45 PM0 commentsViews: 2

6 एप्रिलतमाम तरुण मुलींची आवडती अशी स्पर्धा म्हणजेच 'मिस इंडिया'…'पॅन्टॅलून्स फेमिना मिस इंडिया-2009' नुकताच मुंबईत पार पडला. यात अनेक सौदर्यवतींमधून 'मिस इंडिया-2009', 'मिस इंडिया युनिव्हर्स' आणि 'मिस इंडिया अर्थ' अशा तीन सुंदरींची निवड करण्यात आली. पुण्याची पूजा चोप्रा हिने 'मिस इंडिया-2009' चा किताब पटकावला. दिल्ली गर्ल एकता चौधरी 'मिस इंडिया युनिव्हर्स' ठरली. तर मुंबईचीच श्रीया किशोर 'मिस इंडिया अर्थ-2009 ठरली. या वर्षीच्या तीनही विजेत्या दिल्ली-मुंबई-पुण्याच्या 'बिग टाऊन गर्ल्स' आहेत. वर्षभरात या तीनही सुंदरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधत्व करणार आहेत. माजी 'मिस युनिव्हर्स' सुष्मिता सेन हा कार्यक्रम जज करण्यास आली होती. बॉलीवूड स्टार्स दीपिका पदुकोण, आसिन आणि अजय देवगण कार्यक्रमाचे इतर जजेस होते. तर प्रियंका चोप्रा, कंगना रानावत आणि जेनेलिाया डिसुझा यांच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमात रंगत आणली.

close