माईंड इट, रजनीकांतची ट्विटरवर दमदार एंट्री

May 6, 2014 9:37 AM0 commentsViews: 943

rajnikant 06  मे :  सुपरस्टार रजनीकांतने मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर पदापर्पण केलं आहे. @superstarrajini या नावाने रजनीकांतने ट्विटरवर दमदार एंट्री केली आहे. चाहत्यांनी त्याला फॉलो करण्यासाठी ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे.

पहिल्याच दिवसात सुमारे चार तासात रजनीकांत यांच्या फॉलोअर्सची संख्या 1 लाख 83 हजारांवर पोहोचली आहे. पहिल्याच दिवशी ट्विटरवर अभिनेता सोमवारी दुपारी ट्विटरवर अकाउंट उघडल्यानंतर १५ मिनिटांतच १५ हजारांहून अधिक फॉलोअर्स रजनीकांतशी जोडले गेले. मात्र या सुपरस्टारने अजूनही कोणाला फॉलो केलेले नाही.

रजनीकांतचा आगामी ‘कोचादैय्या’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रजनीने ट्विटरची मदत घेतली आहे.

ईश्वराचं आभार, चाहत्यांना नमस्कार आणि धन्यवाद. माझ्या डिजीटल जर्नीसाठी उत्साहित आहे, असं पहिलं ट्विट रजनीकांतने केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close