बाळासाहेब ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंचा मार्मिक टोला

April 6, 2009 2:32 PM0 commentsViews: 1

6 एप्रिलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काल मराठीच्या मुद्यावर राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोमणा मारला होता. या टीकेला राज ठाकरेंनी आज मुंबईत उत्तर दिलंय. मराठीचा मुद्दा हा कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून कोणताही मुद्दा कोणाचा असू शकत नाही. 1987 मध्ये शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा लावून धरला होता. त्यावेळी आमचा मुद्दा घेतला असा आरोप भाजपने केला नव्हता, असा मार्मिक टोला राज यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना हाणला. तसंच निवडुकांच्या पाश्‍र्वभूमीवर मनसे राज्यात लोकसभेच्या फक्त 12 जागा लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलंय.

close