काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूर पालिका आयुक्तांचा राजीनामा

May 5, 2014 4:56 PM0 commentsViews: 335

chandrakant gudewar06 मे : सोलापूरचे पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी राजीनामा दिला आहे. मनपामधल्या सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ बसपाने रास्ता रोको केला आहे.

पाणी प्रश्नावरून महापालिकेत सत्ताधार्‍यांची गुंडगिरी सुरु आहे. सोलापूरात दर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी दोन दिवासाआड पाणीपुरवठा करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी दमदाटी केली होती. पाणीपुरवठा शक्य नसल्यास आयुक्तपद सोडण्यासाठीही दबाव आणला होता. अखेर गुडेवारांनी राजीनामा दिला आणि सोलापूर शहरही सोडलं आहे.

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची सोलापुरातली कारकिर्द

  • 4 जुलै 2013 ला स्वीकारला पदभार
  • मनपाच्या अधिकार्‍यांना संपत्ती जाहीर करायला लावली
  • अवैध बांधकामांवर कारवाई, नगरसेवक आणि नेत्यांचीही बेकायदेशीर बांधकामं पाडली
  • शहर डिजीटलमुक्त केलं, बड्या नेत्यांच्या फ्लेक्स जाहिराती जेसीबी लावून पाडल्या
  • 26 कामचुकार कर्मचारी निलंबित,20 जणांना पाठवलं घरी
  • टेंडर फुगवून लूट करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं उदा. शेठ मसुरीलालसाऱख्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं
  • कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली न येता काम
  • भ्रष्टाचार कमी केल्यानं अनेक नगरसेवक गुडेवारांवर होते नाराज

 

close