‘सलमानची गाडी आमच्या अंगावरुन गेली’

May 6, 2014 2:47 PM1 commentViews: 4970

hit and run salman06 मे : हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. आजपर्यंत आपल्या हातून हा गुन्हा घडलाच नाही. आपण गाडी चालवत नव्हतो तर ड्रायव्हर चालवत होता असं सांगणार्‍या सलमानला चांगलाच हादरा बसला.

गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात महत्वाची नोंद आज झाली. आज (मंगळवारी) सलमान कोर्टात हजर झाला. यावेळी त्याची ओळख परेड झाली आणि यात एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमान खानला ओळखलं. मुसिलम मियाँ शेख असं या साक्षीदाराचं नाव आहे. सलमान खानच्या गाडीखाली चिरडून शेख जखमी झाला होता.

सलमानची गाडी आमच्या अंगावरुन गेली, असं या साक्षीदारांनं सांगितलं. सलमानने तुमच्या अंगावरुन गाडी घातली, असं तिथे असलेल्या लोकांनी आपल्याला सांगितलं अशीही माहिती या साक्षीदाराने दिलीय. या सुनावणीमुळे सलमान खानच्या अडचणीत सापडला आहे. जर साक्षीदाराची साक्ष कोर्टात गृहीत धरली तर सलमानवर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होईल. या प्रकरणी सलमानला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

असं आहे हिट अँड रन प्रकरण

 • 28 सप्टेंबर 2002 – मुंबईत सलमानच्या गाडीखाली चिरडून 3 जखमी, 1 मृत्युमुखी
 • - सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
 • - महानगर दंडाधिकारी न्यायालयात प्रकरणाची सुनावणी रेंगाळली
 •  2013 – खटला मुंबई सेशन्स कोर्टाकडे
 • - खटला नव्याने सुरू करण्याची सलमानच्या वकिलांची मागणी मान्य
 • - 28 एप्रिल 2014 पासून खटल्याची नव्याने सुनावणी
 • - पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवून खटल्याला सुरुवात
 • - 6 मे 2014 – सलमान खानची ओळख परेड
 • - प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमानला ओळखले

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • SAMEER

  ओळख परेड कशाला ? सलमान खान ला कोण नाही ओळखत, बॉलीवूडचा सलमान खान अस सांगितलं तरी चालल असत . आता तो म्हातारा झाला आहे ,सलमान खान १२ वर्षापूर्वी जरा तरुण होता . साक्षीदाराने ओळख परेड मध्ये सांगितलं, हाच तो म्हातारा !

close