मोदी नीच राजकारणी, जनता माफ नाही करणार -प्रियांका गांधी

May 6, 2014 5:59 PM1 commentViews: 1821

priaynka_vs_modi4406 मे : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातलं शाब्दिक युद्ध सुरूच आहे. अमेठीमध्ये माझ्या शहीद वडिलांचा नरेंद्र मोदींनी अपमान केलाय, त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे अमेठीची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांच्या या नीच राजकारणाला मतदान केंद्रावर आमचे कार्यकर्ते चोख उत्तर देतील अशी घणाघाती टीका प्रियांका गांधी यांनी केली.

तर प्रियांका गांधींच्या टीकेला नरेंद्र मोदींनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. मोदी चहावाला आहे असं म्हणून हिनवलं जातंय. आपण मागास जातीतले असल्यामुळेच आपल्यावर टीका होत आहे. आम्हाला नीच म्हणून नका असा सल्लावजा टोला नरेंद्र मोदी यांनी प्रियांकांना लगावला. उत्तर प्रदेशच्या दोमरियागंजमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे विकासाची भाषा करणारे नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणात जातीवर भर दिला.

पण गांधी विरुद्ध मोदी हे युद्ध सुरूच आहे. गुजरात मॉडेलची पोल खोल केल्यानंतर मोदींनी गुजरात मॉडेलची चर्चा बंद केली. भारतीय तरुणांच्या शक्तीची अमेरिकेच्या अध्यक्षांना भीती वाटते, पण मोदी म्हणतात तरुणांसाठी काय केलं, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली. उत्तर प्रदेशात मिर्झापूरमधल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. विशेष म्हणजे नेहमी मोदींचा उल्लेख टाळून टीका करणारे राहुल गांधी आता नाव घेऊन उघडपणे टीका करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Indian Politician

  निवडणुकीत भारतातील मीडिया डोकेदुखी आणि असभ्यतेचआ राक्षश उभा करतोय. जो कोणी वाइट आणि असभ्य वर्तन करेल त्याला ब्रेकिंग न्यूज़ म्हणायचे आणि दिवसतुन एक हज़ार वेला दाखवायचे प्रताप करतात ज्या मुले लहान मुलावर काय वाइट परिणाम होणार भीतीने टी वि बंद करावा लागतोय.

  राजकारणात राजकारणी मंडली कडून पाखंड आणि सोैंग यांचे पेव फुटले आहे.जो तो रोज नविन सोैंग घेतोय कढ़ी बायांवर बलात्कार हा क्षुल्लक बाबी आहेत अशे भासवले जाते तर कढ़ी मुस्लिम म्हणजे जणू देशाचे एकमात्र खरे सेक्युलर आहेत आणि इतर लोक गुन्हेगार आहेत आसे गृहीत धरून मीडिया चा एक वर्ग देश संकटात आहे अशी अफवा पसरवट आहे.

  अमेठी ची मुलगी आहे मी रायबरेली ची मुलगी आहे वगैरे वगैरे वोट मागायला चलते पण मोदी ने माझ्या मूली प्रमाने आहे म्हटल्या वार मी राजीव गांधी ची मुलगी आहे हा साक्षात्कार म्रियंका ल झाला.

  अन्ना हज़ारे उपोषण वर बसले तेव्हा दोघेही बहिन भाऊ गप्प होते. निर्भया च्या बलात्कार वार प्रतिक्रिया शुन्य भाऊ बहिणीला निवडणुकीत आता पोपटा प्रमाणे वाचा फुटली आहे.

  निर्लज्जाम् सदा सुखी हा लोकशाही च पाया आहे ऎसे चित्र आहे.

close