महिला पाळत प्रकरणाची चौकशी थांबवा, ‘ती’च्या वडिलांची कोर्टात धाव

May 6, 2014 6:16 PM0 commentsViews: 1145

supremecourt06 मे : स्नूपगेट प्रकरणाला आज आणखी एक वेगळं वळण मिळालंय. गुजरातमधल्या ज्या आर्किटेक्ट महिलेवर पाळत ठेवण्यात आली होती, तिच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

या प्रकरणाची गुजरात सरकार आणि केंद्र सरकार करत असलेली चौकशी थांबवण्याची विनंती त्यांनी कोर्टाकडे केलीय. तसंच या प्रकरणातला गुलेल डॉट कॉम या वेबसाईटवरचा वादग्रस्त मजकूरही काढण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केलीय. यानंतर सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा निर्णय नवं सरकार घेणार असल्याचे सोमवारीच केंद्राकडून सांगण्यात आलंय. तर गुजरात सरकारने यापूर्वीच एक चौकशी समिती स्थापन केलीय. पण,तिचा अहवाल अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. गुजरातमधल्या एका आर्किटेक्ट महिलेवर मोदी सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close