नीच काम असतं, नीच जात नसते – राहुल गांधी

May 7, 2014 9:35 AM0 commentsViews: 943

54rahul_gandhi_latur07 मे :  ‘नीच काम असतं, नीच जात नसते’ असं प्रत्युत्तर आज सकाळी राहुल गांधी यांनी मोदींना दिले आहे. अमेठीत पत्रकारांनी त्यांना विचारले, मोदी म्हणतात मी मागास जातीतील असल्याने गांधी परिवार मला लक्ष्य करत आहेत, यावर राहुल गांधी म्हणाले, ‘जात नीच नसते, व्यक्तीचे कर्म आणि विचार नीच असतात. क्रोध आणि रागाचे विचार हे नीच असतात.’

आठव्या टप्प्याचं मतदान सुरू असतातना पुन्हा जातीचा राग आवळला आहे. याची सुरूवात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातलं शाब्दिक युद्धातून झाली. ‘भाजपच्या नीच राजकारणाला आमचे मतदार मतदान केंद्रावर चोख उत्तर देतील’ अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी अमेठीत केल्यानंतर मोदींनी प्रियांका गांधींच्या टीकेला लगेच प्रत्युत्तर दिलं.
‘मी मागास जातीतला असल्यामुळे माझ्या विरोधकांना माझं राजकारण खालच्या थराचं वाटतं. काही लोकांना हे आवडणार नाही, पण मागास जातींनी केलेल्या त्यागांमुळेच हा देश या उंचीला येऊन पोहोचला आहे.’ असा सल्लावजा टोला नरेंद्र मोदी यांनी प्रियांकांना लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close