काश्मीरमधल्या मतदान केंद्रावर ग्रेनेडचा हल्ला

May 7, 2014 12:18 PM0 commentsViews: 744

kashmir voing07 मे : काश्मीरमधल्या बारामुल्ला आणि लेह या दोन मतदारसंघांमध्ये आज आठव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे पण इथे मतदानात अडथळा आणण्याचा प्रयत्न होतं आहे.

बारामुल्ला मतदारसंघात पहलन पट्टण इथल्या मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला झाला आहे. यात 1 सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. बारामुल्ला आणि सोपोरमध्ये जोरदार दगडफेकही झाली. सोपोर हा हुर्रियतच्या जहाल गटाचे नेते सय्यद शाह गिलानी यांचा तळ आहे.

बारामुल्ला हा पाकिस्तानच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या 6 जागांपैकी 4 जागांवर मतदान झालंय. गेल्या टप्प्यामध्ये श्रीनगरमध्ये मतदान झालं होतं, तिथं फारसं मतदान झालं नव्हतं. आता बारामुल्लामध्ये तरी चांगलं मतदान होतं की नाही याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close