नेगी यांनीही केलं मतदान

May 7, 2014 3:11 PM0 commentsViews: 361

07 मे : स्वतंत्र भारतातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौर मतदारसंघातल्या कल्पा इथं त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. 1951 पासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं आहे. नेगी यांनी आतापर्यंत त्यांनी २८ वेळा मतदान केलं आहे. ज्यात १६ वेळा लोकसभा आणि १२ वेळा विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.

त्यांनी सगळ्यांनाच मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. नेगी हे 97 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीनंही त्यांच्यासोबत मतदान केलं.

२५ ऑक्टोबर रोजी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शाम शरण नेगी रांगेत पहिला नंबर लावला होता. त्यांनी मतदान केलं आणि त्याचसोबत स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांचं नाव इतिहासत नमूद झालं. गुगलने काहीच दिवसांपूर्वी नेगी यांच्यावर व्हिडिओ केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close