इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयची अमित शाहना क्लीन चीट

May 7, 2014 5:14 PM0 commentsViews: 504

amit shah07 मे : गुजरातमधील इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने भाजप नेते अमित शाह यांना दिलासा मिळाला आहे. अमित शाह यांच्याविरोधात सीबीआयला पुरेसा पुरावा मिळाला नाही त्यामुळे त्यांना क्लीनचीट दिली असल्याचं सीबीआयकडनं सांगण्यात आलं आहे.

गुजरात पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये शिकणा-या इशरत जहाँ या मुंबईच्या तरूणीचं एन्काऊंटर केला होता. त्यात इशरतसह अन्य चार जण ठार झाले होते. या चकमकीमध्ये ठार करण्यात आलेले सर्वजण लष्कर-ए-तैयबाचे अतिरेकी असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, यावरून काँग्रेस सीबीआयचा गैरवापर करत होती हे स्पष्ट होतं, अशी टीका भाजपनं केलीये. अमित शाह यांना त्रास देण्यासाठी काँग्रेस आणि सीबीआयनं खोटे आरोप लावले, असा आरोप भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केला. तर काँग्रेसनं मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close