वाराणसीत मोदींच्या सभेला परवानगी नाकारली

May 7, 2014 5:44 PM0 commentsViews: 1037
narendra_modi_hariyana07 मे : वाराणसी जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सभांना परवानगी नाकारली आहे. मोदींच्या तीन सभा होणार होत्या पण अधिकार्‍यांनी या जागा सभा घेण्यासाठी योग्य नाहीत असं म्हटलं आहे.
वाराणसीमध्ये 12 मे ला मतदान होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार नरेंद्र मोदी वाराणसीततीन प्रचारसभा घेणार होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून एका सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. भाजप नेते अरुण जेटलींनी या निर्णयाचा विरोध केलाय आणि निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close