पवार-मोदींनी केले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

April 7, 2009 7:24 AM0 commentsViews: 1

7 एप्रिलराष्ट्रीवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. दुसर्‍यांवर आरोप करणे हाच मोदींचा एककलमी कार्यक्रम आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर काल सोमवारी ठाण्यात काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात तोफ डागली. ' मोदींना महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे, पण धर्मांध शक्तींना महाराष्ट्रात थारा मिळणार नाही, ' असंही पवार सभेत मोदींना म्हणाले. यावेळी राज्यभर काँग्रेस-आघाडीला चांगलं वातावरण असल्याचं मी बघतोय असा निवडणुकीबाबतचा आशावादही त्यांनी सभेत मांडला. पवारांनी मोदींवर केलेल्या आरोपांचं उत्तर त्यांनी कालच्या नांदेडच्या सभेत केलं. मोदींनीही पवारांची सभेत खिल्ली उडवली. ' शिख दंगलीत दोषी असणार्‍या जगदीश टायटलर यांना काँग्रेसनं उमेदवारी कशी काय दिली, अशा काँग्रेससोबत शिख बांधव जातील काय, असा सवाल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विचारला.

close