केजरीवाल यांचं मोदींना थेट चर्चेचं आव्हान

May 8, 2014 2:31 PM0 commentsViews: 505
Kejriwal_allege712908 मे : वाराणसीची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे थेट आरोप-प्रत्यारोप वाढतायेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढत असलेले ‘आप’चे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून आता मोदींना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.
‘मी मोदींना खुल्या चर्चेचं निमंत्रण देतो. काशीच्या जनतेला आम्हा दोघांनाही थेट प्रश्न विचारू देत. या चर्चेची वेळ आणि स्थळ मोदींनी ठरवावं. भाजपचे श्रेष्ठी वाराणसीत आलेत. यावरून ते घाबरलेत हे दिसतं. मोदींना पराभावापासून ते वाचवू शकतील का? गंगा आरतीला परवानगी मिळालीय तर आरती करण्याऐवजी मोदी राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतायेत. मी एक दिवस एकटा गंगा आरती करून आलो. मला कुणीही अडवलं नाही. मी आज पुन्हा माझ्या पत्नीबरोबर जाऊन आरती करणार आहे. हेतू चांगला पाहिजे.’
निवडणूक आयोगाने मोदींना एक सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गंगा आरती न करण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. गंगा आरती करू शकत नसल्याबद्दल नरेंद्र मोदींनीही आज सकाळी ट्विट करून खेद व्यक्त केला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी आज वाराणसीत आंदोलन सुरू आहे. वाराणसीमध्ये 12 मे रोजी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या येथील राजकीय वातावरण तापले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close