पंजाबमध्ये महसूल मंत्र्यांना भांडी घासण्याची शिक्षा

May 8, 2014 3:51 PM0 commentsViews: 1342

08 मे :  पंजाबचे महसूल मंत्री बिक्रम सिंग मजिठिया यांना तन्खा म्हणजेच धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरूद्वारातील लंगरमध्ये सेवा करण्याची ही शिक्षा आहे. गुरूद्वारातील भांडी घासणे, येणा-या भाविकांची बूट स्वच्छ करून देणे असं या शिक्षेचं आणि सेवेचं स्वरूप आहे. मजिठिया यांना पाच वेगवेगळ्या गुरूद्वारात जाऊन ही सेवा करायची आहे.

आनंदपूरमधल्या केसघर साहिब, भटिंडातल्या दमदमा साहिब या गुरूद्वारांमध्ये त्यांनी मंगळवारी शिक्षा भोगली. सेवेचा पुढचा टप्पा म्हणून ते आज नांदेडमधल्या गुरूद्वारात आले होते. तिथे पंजप्यारे साहिब यांच्या आदेशानं त्यांनी भांडी घासण्याची सेवा केली. मजिठिया यांना नांदेडच्याच हुजूर साहिब यांनी शिक्षा सुनावली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close