पत्रकाराने भिरकावला गृहमंत्र्यांवर जोडा

April 7, 2009 8:06 AM0 commentsViews: 1

7 एप्रिल, नवी दिल्ली काँग्रेस मुख्यालयात आज दहशतवाद विरोधाचा काय अजेंडा असणार आहे त्यासंदर्भातली पत्रकार परिषद भरली होती. त्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान एका पत्रकाराने गृहमंत्र्यावर जोडा भिरकावला. गृहमंत्री चिदंबरम् यांना जर्नेल सिंग या पत्रकाराने 1984 च्या शीख विरोधी दंगलीत जगदीश टाईटलर यांना निर्दोश ठरवण्या संदर्भात प्रश्न विचारला होता. आपल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांने गृहमंत्र्यावर जोडा भिरकावला. जर्नेल सिंग याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी आपण जर्नेल सिंग याला माफ केल्याचं सांगितलं. या घटनेदरम्यान चिदंबरम् कुठेही विचलित झाले नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद पूर्ण पार पाडली. जर्नेल सिंग हे जागरण समूहाच्या मासिकाचे पत्रकार आहेत. नेत्यांवर प्रेक्षकांतून हल्ले होण्याची घटना काही नवीन नाही. नाशिकच्या सभेत शरद पवारांवर आंदोलक शेतक-यांनी कांदे भिरकावले होते आणि सभा उधळली होती तसंच जॉर्ज. डब्ल्यू बुश यांच्यावर अफगाणिस्तानात इराकी पत्रकाराने जोडे भिरकावले होते. जांबुवंतराव धोटे यांनी महाराष्ट्र विधी मंडळात अध्यक्षांना पेपर वेट मारला होता.

close