गोव्यात मडगावमध्ये स्फोट, 1 ठार

May 8, 2014 7:38 PM0 commentsViews: 1342

76goa_news08 मे : गोव्यात मडगावमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास एक स्फोट झालाय. या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झाले असल्याचं कळतंय. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीय.

गोवा क्राईम ब्राँचचं पथक स्फोटाच्या ठिकाणाकडे रवाना झालंय. हा स्फोट सिलेंडरचा आहे की पेट्रोलियम पदार्थाचा आहे की इतर काही याचा शोध घेणं सुरू आहे.

घटनास्थळी मडगावचे एस.पी दाखल झाले आहे असून मदतकार्य पोहचले आहे. हा स्फोट जिलेटीनचा असल्याची शक्यता गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी व्यक्त केलीय. स्फोटात मरण पावलेली व्यक्ती खाणकामगार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close