निवडणूक आयोग राजकीय पक्षांना घाबरत नाही -व्ही.एस.संपत

May 8, 2014 8:17 PM0 commentsViews: 712

67v k samant08 मे : निवडणूक आयोग नि:पक्षपातीपणे काम करत असून कोणत्याही राजकीय पक्षाला घाबरत नाही असं सडेतोड उत्तर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी दिलंय. तसंच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आयोगाबद्दल विधान करताना भान बाळगावे असा समजही संपत यांनी दिला.

स्थानिक प्रशासनाच्या अहवालामुळेच नरेंद्र मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली होती त्यामुळे आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत हे शक्यच नाही असंही संपत यांनी ठणकावून सांगितलं.

वाराणसीत मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे भाजपने आगपाखड करत थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोग पक्षपातीपणा करते असा आरोप मोदी यांनी केला होता. मोदींच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

भाजपने संबंधीत अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यावर आयोगाने खुलासा केला. निवडणूक नि:पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे. स्थानिक ठिकाणी अधिकार्‍यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे. त्यामुळे अशा छोटा-छोट्या गोष्टींवर त्यांची बदली करता येणार नाही असंही संपत यांनी स्पष्ट केलं.

तसंच मोदींच्या रॅलीला स्थानिक सुरक्षाच्या कारणांस्ताव परवानगी नाकारण्यात आली होती त्या पण काही तासांत परवानगी देण्यात आली होती. गंगा आरतीलाही परवानगी दिली होती असंही त्यांनी सांगितलं. तसंच अमेठीमध्ये मतदानाच्या दरम्यान राहुल गांधी मतदान केंद्रावर असल्याचे समोर आलंय त्याबद्दल काय कारवाई करणार असं विचारलं असता याबद्दल अहवाल मागवण्यात आला असून चौकशी केली जात आहे जर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असंही संपत यांनी स्पष्ट केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close