सोलापुरात दिवाळी, गुडेवारांचं पालिकेत जंगी स्वागत

May 8, 2014 9:32 PM1 commentViews: 646

08 मे : सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. यावेळी महापालिकेत फटाक्यांच्या आतषबाजीत, फुलं उधळून गुडेवारांचं स्वागत करण्यात आलं. गुडेवार परत येणार म्हणून सोलापुरात ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता मला आणखीन वेगाने काम करण्याची प्रेरणा मिळाली अशी प्रतिक्रिया गुडेवार यांनी दिली. तर चंद्रकात गुडेवारांनी पुन्हा रुजू होणं म्हणजे आज सोलापुरात दिवाळी असल्याचं मत ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते नरसय्या अडाम यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या दादागिरीमुळे गुडेवार यांनी बदलीची मागणी केली होती. त्यानंतर सोलापूरमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं होतं. सोलापुरकरांच्या आंदोलनांनंतर गुडेवार पुन्हा एकदा पदभार स्वीकारला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • nagesh kshirsagar

    gudewar sir hats of you ………we are love solapurkar…thanks

close