मुंगनेरमध्ये पोलीस-नक्षलवादी चकमक : 13 नक्षलवादी ठार, तीन जवान शहीद

April 7, 2009 8:23 AM0 commentsViews: 8

7 एप्रिल, गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यामधल्या मुंगनेर गावाजवळ काल संध्याकाळी सहा वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय. या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झालेत. तर सी 60 चे तीन जवान शहीद झालेत आणि सहा पोलीस जखमी झालेत. गेल्या दोन महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे सतत हल्ले होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांवर बिहष्कार घालण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी काही पत्रकंही वाटली होती. त्यांचा हा उपद्रव हाणून पाडण्यासाठी सी 60 च्या पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत गोपीचंद नैताम, कालिदास वड्डे आणि ज्ञानेश्वर सेप हे पोलिस शहीद झाले आहेत. दरम्यान रात्री उशीरा नक्षलवाद्यांनी एटापल्ली इथे बांबूचा डेपो जाळला आणि पेट्रोलपंपाचीही तोडफोड केली. यापूर्वी 1 फेब्रुवारीला नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 पोलीस शहीद झाले होते.

close