‘कवी जो देखे उंटावरुन’

May 8, 2014 9:48 PM0 commentsViews: 194

08 मे : ‘जो ना देखे कवी वो देखे रवी’ असं म्हटलं जात पण कवी जो देखे उंटावरुन असं काही घडलं पुण्यात. ‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही कारण पिंपरी चिंचवडमध्ये एक हटके कवी संमेलन रंगल होतं. या कवींनी चक्क उंटावर बसून आपल्या कविता सादर केल्या. पिंपरी-चिंचवड परिसरात वाड्या वस्त्यांवर जाऊन कवींनी कविता सादर करत,पाणी बचतीचा संदेश दिला. या कवींनी सादर केलेल्या कवितांनी अनेकांना भुरळ घातली आणि पिंपरी चिंचवडकरांनी टाळ्या वाजवून प्रतिसादही दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close