रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या अपघातात एका कुटुंबाचा करूण अंत

May 9, 2014 9:47 AM0 commentsViews: 3422
khed09 मे :  रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या अपघातात एका कुटुंबाचा करूण अंत झाला आहे. अपघातात मरण पावलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घेऊन गावी परत येताना कारवर जेसीबी आदळून आई-वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी खेड इथे घडली.
खेडमधल्या प्रवीण कदम आणि प्रियांका कदम यांची मुलगी धनश्री कदमचा सीईटीच्या परीक्षेला जाताना रिक्षा अपघातात मृत्यू झाला. तिचा मृतदेह रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात होता. तिचे आई-वडील अल्टो कारमधून मुलीचा मृतदेह घरी घेऊन जात होते. त्यावेळी या दु:खी दांपत्यावर काळाने पुन्हा घाला घातला. हातखंबा इथे त्यांच्या कारवर ट्रेलरवर ठेवलेले जेसीबी कोसळून कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात कदम दांपत्यासह कारचालकाचा मृत्यू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close