अर्जुनसिंग यांना झाले अश्रू अनावर…

April 7, 2009 9:17 AM0 commentsViews: 2

7 एप्रिल, बलियातुम्ही त्यांना ओरडताना बघितलं असेल, तुम्ही त्यांना हसतांनाही बघितलं असेल… पण आज ते एका सभेत रडले. हे ते कोणी सर्वसामान्य नाहीयत तर आहेत मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग. ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग बलियामधल्या एका पार्टी कार्यक्रमात स्टेजवर रडले. त्यांच्या मुलीला तिकीट नाकारल्यानं ते गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय अस्वस्थ होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या. भोला पांडेंनी अर्जुन सिंगांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांनाही अश्रू आवरले नाही. भोला पांडे हे सीलामपूरहून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

close