वकिलांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घ्या -खडसे

May 9, 2014 1:36 PM0 commentsViews: 1589

Image img_228892_eknathkhadse_240x180.jpg09 मे : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. हा खटला हाताळणार्‍या ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी आणि ऍड. प्रवीण चव्हाण या दोन्ही वकिलांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

हे दोन्ही वकील प्रभावीपणे सरकारची बाजू मांडतायत त्यामुळेच त्यांची नियुक्ती राजकीय दबावाखाली रद्द करण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. या दोन वकिलांना हटवत सुरेशदादांसह इतर आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची शंका खडसेंनी उपस्थित केली आहे. ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर जनआंदोलन उभं करू असाही इशारा एकनाथ खडसेंनी दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close