मुंबईकरांसाठी मेट्रो सज्ज पण तिकीट दरवाढीचा तिढा कायम

May 9, 2014 1:59 PM0 commentsViews: 1620

Image img_237242_mumbaimetrorun_240x180.jpg09 मे : मुंबईतली वर्साेवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत दाखल व्हायला सज्ज झाली आहे. पण या मेट्रो रेल्वेच्या तिकीटाचे दर काय असावेत यावरुन सध्या वाद सुरू आहे.

मेट्रो रेल्वे ऍक्ट नुसार प्रकल्प करारानुसार तिकीट दर असावेत, पण मुंबई मेट्रोची डेडलाईन तब्बल नऊ वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे निर्धारीत वेळेत प्रकल्प पुर्ण करु न शकलेल्या रिलायंन्स मेट्रो आता प्रकल्पाचा वाढीव खर्च मुंबईकरांकडुन वसुल करणार असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. तसेच मेट्रोच्या दरवाढी विरोधात मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्र लिहीलं आहे.

दरम्यान, या तिकीट दर वाढीसंदर्भात रिलायन्स कंपनीने त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close