मुंबईकरांना टाटांच्या स्वस्त वीजेचा पर्यायही होणार उपलब्ध

May 9, 2014 10:05 AM0 commentsViews: 290

Image img_226202_bestelectricity_240x180.jpg09 मे :  मुंबई शहरातल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना आता टाटाच्या स्वस्त विजेचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे. बेस्टनं टाटाच्या विरोधात केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढलेली वीज बिलं कमी होण्याची शक्यता आहे.

बेस्टची मक्तेदारी संपुष्टात येऊन ग्राहकांना टाटाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. परिवहनामुळे आधीच तोट्यात चालणार्‍या बेस्टला या निर्णयामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

स्वस्त वीजेचा पर्याय

घरगुती ग्राहक बेस्टचा दर टाटाचा दर दरमहा बचत (अंदाजे)

(रुपये) (रुपये) (रुपये)
100युनिटपर्यंत 3.20 2.49 0.70
100 ते 300 युनिट 6.38 4.13 6.75
301 ते 500 युनिट 8.41 7.31 8.15
500 युनिटपेक्षा अधिक 11.40 9.09 11.57

 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++