मोदी मागासवर्गीय नाहीच, काँग्रेसचा दावा

May 9, 2014 4:44 PM0 commentsViews: 619

27457345345345 modi on 509 मे : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जातीवरुन आता काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद सुरू झालाय. नरेंद्र मोदी हे स्वतःला मागासवर्गीय म्हणवतात. मात्र, ते उच्च वर्गातले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

 

तर 20 वर्षांपूर्वीच मोदींचा ओबीसी यादीत समावेश झाल्याचं प्रत्युत्तर भाजपने दिलंय. 2002 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर गुजरात सरकारने एक ठराव मंजूर करून घेतला आणि मोदी ज्या मोध घांची समाजाचे आहेत, त्या समाजाचा समावेश ओबीसीमध्ये केला असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

 

मोध घांची हा अल्पसंख्याक समाज फक्त गुजरातमध्येच आढळतो. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय 2000मध्येच घेतला होता असं भाजपनं म्हटलं आहे. तर जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनीही नरेंद्र मोदी मागासवर्गीय असल्याबद्दल शंका व्यक्त केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close