पुसदमध्ये संचारबंदी कायम – सामान्यांना बसला दंगलीचा फटका

April 7, 2009 9:47 AM0 commentsViews: 24

7 एप्रिल, पुसदगेल्या तीन दिवसांपासून पुसदमध्ये लावण्यात आलेली संचारबंदी अजूनही कायम आहे. पोलिसांनी या प्रकरणी 40 जणांना ताब्यात घेतलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातल्या पोखरी गावातल्या शेत वजा झोपडीत राहणा-या जमीर खान आणि रझिया खान या मुस्लीम दांपत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडले होते. त्यावरून पुसदमध्ये दंगल भडकून परिस्थितीत तणावपूर्ण झाली होती. परिस्थिती स्फोटक होऊ नये म्हणून यवतमाळ पोलिसांनी संचारबंदी लावली होती. आज सकाळी बारावाजेपर्यंत ती शिथिल करण्यात आली होती. पण आता ती थोडी कडक करण्यात आली आहे. पुसदमधली स्फोटक परिस्थिती पाहता लोकं गावातून निघून जात आहेत. पोखरी गावात शुक्रवारी रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर पुसदमध्ये दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. पुसदमध्ये शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलीमध्ये दोनजणांचा मृत्यू झाला होता. याच दंगलीतून वृद्ध दांपत्याची हत्या झाली का, या दिशेने पोलिसांनी तपास करत आहेत. दरम्यान पुसद दंगलीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. गृहमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पुसदला भेट दिली.

close