बालविवाह रोखला म्हणून लाठ्याकाठ्यांनी मारहाण, घराची नासधूस !

May 9, 2014 5:49 PM0 commentsViews: 803

8hingoli_news09 मे : हिंगोलीमध्ये बालविवाह थांबवला म्हणून एका नागरिकाला मारहाण केल्याची तसंच त्याच्या घराची नासधूस केल्याची लांच्छनास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी 23 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटक करण्यात आली तर उर्वरीत आरोपी फरार आहे.

हिंगोलीतल्या रिसाला बाजार या भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. त्या मुलीनं त्याच भागात राहणार्‍या विष्णू हनुवते यांच्याकडे हा बालविवाह थांबवण्यासाठी मदत मागितली. त्यामुळे विष्णू हनुवते यांनी पोलिसांना या बालविवाहाची माहिती दिली.

 

त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा विवाह थांबवला. त्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी जमाव गोळा करून विष्णू हनुवते यांच्या घरावर हल्ला केला. लग्न मोडल्याचा जाब विचारत हनुवते यांना घरात घसून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसंच घरातली एक ते दीड लाख रुपये किंमतीच्या सामानाची मोडतोडही केली. या प्रकरणी पोलिसांत 23 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close