‘हम भी कम नहीं’,केजरीवालांचं वाराणसीत जोरदार शक्तिप्रदर्शन

May 9, 2014 8:25 PM0 commentsViews: 1772

kejriwal roadshow09 मे : वाराणसीच्या रणसंग्रामात प्रचाराने रंगत आणलीय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अप्रत्यक्षपणे भव्य रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. ‘हम भी कम नही’ असं सांगत आज (शुक्रवारी) आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही वाराणसीत भव्य रोड शो काढला. या रोड शोला आपच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यापूर्वी त्यांनी वाराणसीच्या ग्रामीण भागात रोड शोही केला होता.

संध्याकाळी वाराणसीत आयोजित या रॅलीला आपच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आपच्या कार्यकर्त्यांनी हातात पांढरे झेंडे घेऊन ‘अब की बार इमानदार सरकार’च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. दुपारी चार वाजता सुरू झालेली रॅली रात्री उशिरा संपली. रॅली संपल्यानंतर केजरीवाल यांचे भाषणही झाले यावेळी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. दरम्यान, सकाळी केजरीवाल यांनी ग्रामीण भागातल्या रोड शो घेतला यावेळी केजरीवाल यांनी मोदींवर सडकून टीका केली.

भाजप इथं निव्वळ राजकारण करत आहे. ‘गंगा माँ ने बुलाया है’ असं म्हणणार्‍या मोदींना आयोगाने परवानगी दिली होती मग आरती करण्यासाठी का आले नाही ? ‘गंगा माँ’ने बोलावून सुद्धा मोदी आले नाही. मुळात मोदींची इच्छाच नव्हती आरती करण्याची अशी बोचरी टीकाही केजरीवाल यांनी केली. तसंच वाराणसीमध्ये आपण मोठ्या फरकारनं विजयी होईल आणि मोदींचं डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close